ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

आटपाडीच्या आठवडी बाजार व शेळी-मेंढी बाजार बद्दल मोठी अपडेट

06:29 PM Nov 19, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहराचा आठवडी बाजार हा शनिवारी असतो. परंतु शनिवार दिनांक २३ रोजी खानापूर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्याने या दिवशी भरणारा आठवडा बाजार हा दिनांक २२ रोजी शुक्रवारी भरणार आहे.

 

आटपाडी हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी आठवडी बाजार हा शनिवारी भरत असतो. तर शेळी-मेंढी बाजार हा आटपाडी बाजार समितीचे आवारामध्ये भरत असतो. या आठवडी बाजारासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला शेती माल विक्रीसाठी आणत असतात. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणत शेळ्या-मेंढ्या यांची खरेदी विक्री होत असते.

 

परंतु खानापूर विधानसभा मतदार संघासाठी उद्या दिनांक २० रोजी मतदान संपन्न होणार आहे. तर मतमोजणी दिनांक २३ रोजी संपन्न होणार आहे. मतमोजणी ही दिनांक २३ रोजी असल्याने व आठवडी बाजार देखील याच दिवशी असल्याने, आटपाडी नगरपंचायत व आटपाडी बाजार समिती यांच्याकडून परिपत्रक काढून शनिवार दिनांक २३ रोजी होणारा आठवडी बाजार हा दिनांक २२ रोजी शुक्रवारी भरविण्यात येणार असून याची नोंद शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी घ्यावी असे नमूद केले आहे.

 

 

Tags :
Atpadi weekly marketAtpadi weekly market and goat-sheep weekly market
Next Article