ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

आटपाडी : लेंगरेवाडीत २५ लाख रुपयांची चोरी

08:13 AM Sep 25, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी येथील, शेटफळे चिंध्यापीर रस्त्यावर सोपान ज्ञानू लेंगrरे यांच्या शेतामध्ये भूमी रोड एक्युपमेंट या रोड बनवणाऱ्या कंपनीचे डांबरी करणासाठी लागणारे हॉटमिक्स प्लान्ट उभारण्यात आला होता.

 

परंतु या प्लान्ट मधील ड्रायर ड्रम व त्याचे साहित्य, फोर बिन फिडर व त्याचे साहित्य, बीटूमेंट टॅंक आणि केबिन पॅनेल असे साहित्य चोरून नेल्याची घटना दिनांक १५/१२/२०२३ ते २३ /०५/२०२४ रोजीच्या दरम्यान घडली आहे. याबाबत दीपक शंकर पाटील व बापूसाहेब सोपान लेंगरे रा.लेंगरेवाडी यांच्या विरोधात मालक राहुल विलासराव साळुंखे रा.कमलापूर यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी दीपक पाटील व बापूसाहेब लेंगरे यांनी हॉट मिक्स डांबर प्लान्ट हा स्वतःचा आहे असे सांगत तो चोरून नेत सांगोला येथील मधुकर बाबासो साळुंखे रा.बामणी ता.सांगोला याला विक्री केला आहे. त्याची एकूण किंमत 25 लाख 65 हजार रुपये इतकी आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 

Tags :
Atpadi NewsAtpadi Polic Thaneआटपाडी बातमी
Next Article