ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

आटपाडी : करगणी येथील डाळिंब बागेतील डाळिंबाची चोरी

04:35 AM Sep 28, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथे डाळिंब बागेतील डाळिंबाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असून, अंदाजे 70 हजार रुपयांचे डाळिंब चोरून नेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, करगणी येथे भीमराव आप्पा होनमाने यांची शेत जमीन असून या ठिकाणी त्यांनी डाळिंब पिकाची लागवड केली आहे. सदरचे डाळिंब पिक पंधरा दिवसानंतर विक्रीसाठी बाजारात आणण्यात येणार होते. परंतु दिनांक 26 रोजी च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या डाळिंब बागेमध्ये असणाऱ्या दोनशे डाळिंब झाडाचे डाळिंब अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. त्यामुळे भीमराव होनमाने यांची अंदाजे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत अज्ञात चोरट्या विरुद्ध भीमराव होनमाने यांनी आटपाडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद केला असून सदर प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

Tags :
Atpadi Polic ThaneKargani newsPomegranatePomegranate theif karganiPomegranate-Crop
Next Article