ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

आटपाडी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, पतीकडून पत्नीस लाकडाने मारहाण

08:30 AM Sep 25, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने जीवे मारण्याची धमकी देत लाकडाने मारहाण केल्याची घटना आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजता घडली असून फिर्यादी छाया बापू लेंगरे (वय २७) व्यवसाय घरकाम (रा. लेंगरेवाडी) यांनी पती आरोपी बापू जगन्नाथ लेंगरे याच्याविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस स्टेशमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती बापू लेंगरे याने सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पत्नी छाया घरी असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करून तुला जिवंत ठेवत नाही. असे म्हणून चुली शेजारी असलेल्या लाकडाने जोरदार मारहाण करून पत्नी छाया हिला जखमी केले. या घटनेबाबत आटपाडी येथील पोलिस अधिक तपास करीत आहेत

 

Tags :
Atpadi Polic ThaneLengarewadi News
Next Article