ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

आटपाडी : पळसखेल येथे सौर उर्जा कंपनीच्या कामगारांना मारहाण

11:15 AM May 10, 2025 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील पळसखेल येथे सौर उर्जा कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मारहाण करण्यात आली असून, याप्रकरणी पाच जणासह अनोळखी १० ते १५ जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सागर शिवाजी कोल्ले यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.

 

कोल्ले यांनी दिल्लेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी हे मी सागर शिवाजी कोल्ले वय 35 वर्षे व्यवसाय खाजगी मौट्रक्स ग्रेटिंग प्रा. लिमिटेड कोल्हापुर या खाजगी कंपनीमध्ये गेल्या 2 वर्षांपासून प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर नोकरीस आहे. कंपनीचे काम मागील 1 वर्षापासुन आवादा एनर्जी प्रा. लिमिटेड दिल्ली याचे मार्फतीने वेगवेगळ्‌या ठिकाणी काम करीत आहे. पळसखेल येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत पळसखेल ता आटपाडी जि सांगली येथे गेल्या 10 दिवसापासून आम्ही पॉवर स्टेशनचे काम करीत आहोत.

दिनांक ८ रोजी सकाळी 10.00 वा चे सुमारास फिर्यादी यांच्या सोबत असलेले इतर 10 कामगार पळसखेल येथील पॉवर स्टेशन येथे इलेक्ट्रीक खांब रोवण्याचे काम करत होती. तेव्हा नितीन मोरे, विकास मोरे, सचिन मोरे, जितेंद्र मोरे, संजय सावत व इतर 10 ते 15 अनोळखी इसम हातामध्ये लाठ्या, काठ्या व दगडे घेवून आले व तुम्ही येथे तुमच्या प्रोजेक्टचे काम करायचे नाही असे म्हणून शिवीगाळ करून आमचेवर दगड फेक करून आम्हांस त्यांचे हातातील नाठ्या काठ्याने मारण्यास सुरवात केली.

दगड फेकीत व मारहाणीत फिर्यादी तसेच संतोष सुभाष पाटील, रामप्रसाद शर्मा, संजय बाबर, किशोर महाडीक, अविनाश साळुंखे, मुर्शीद कोलेकर, परमेश्वर रेड्डी रमेश कुमार हे जखमी झालेले आहेत. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी नितीन मोरे, विकास मोरे, सचिन मोरे, जितेंद्र मोरे, संजय सावत व इतर 10 ते 15 अनोळखी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags :
Adanai Power Project PalaskhelAtpadi CrimeAtpadi NewsAtpadi Polic Thane
Next Article