आटपाडी : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी यासाठी आमरण उपोषण
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आटपाडी तालुका शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष शेखर निचळ हे आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन त्यांनी तहसीलदार यांना दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असून, गेल्या दोन ते तीन वर्षापासून शेतकरी गंभीर दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, महापूर या संकटाचा शेतकरी मोठ्या ताकदीने सामना करतो आहे. शेतकऱ्याचे जगणं मुश्किल झाले आहे. गेली दोन ते तीन वर्षे झाले या संकटाचा सामना करताना शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे, शेतकरी हवालदील झाला आहे. अशा परिस्थीतीत शेतकऱ्यांनं जगायचे कसे त्यांचे कुंटूंब चालवायचे कसे हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.
शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही. शेतकरी प्रत्येक गोष्टीत तोटा सहन करत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने जर शेतकऱ्यांना धीर द्यायचा नाही तर मग कोणी द्यायचा. त्यामुळे येत्या दोन आठवड्यात (14 दिवस) महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. अन्यथा मी 27 ऑगस्ट 2024 पासून ग्रामपंचायत कार्यालय, समोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहे.