आटपाडी : आंबेबनमळा येथील युवकाचा व्यायाम करताना दुर्दैवी मृत्यू
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील आंबेबनमळा येथील युवकाचा व्यायाम करत असताना ह्र्दयविकाराच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक १७ रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान दुर्दैवी घटना घटली.
याबाबत अधिक माहिती अशी, आंबेबनमळा येथील शंकर तानाजी जाधव (वय २८) हा युवक चार दिवसापासून व्यायाम करत आहे. आज दिनांक १७ रोजी सकाळी ८ च्या दरम्यान तो सायकलिंग करत व्यायाम करीत असताना त्याला अचानक चक्कर आली. त्यामुळे तो खाली कोसळला. हा प्रकार लक्षात येताच त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याने या जगाचा निरोप घेतला.
बदललेल्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तणाव वाढत चालला आहे. त्यामुळे अनेकांना विविध आजारांचा आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. व्यायाम सर्वांसाठी जरूरीचा आहे, पण व्यायामाच्या पद्धती योग्य असाव्यात. व्यायाम करणे चांगले असले, तरी जास्त व्यायाम हृदयासाठी धोकादायक आहे.