ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

आटपाडी : लेंगरेवाडीच्या “संचिता” ची पोलीस दलात निवड

10:43 PM Sep 15, 2024 IST | Mandesh Express

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी गावाची कन्या कु. संचिता चिंतामणी लेंगरे हिची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. तिच्या या निवडीने तिचे समाजातील सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

 

कु. संचिता हिचे प्राथमिक शिक्षण हे लेंगरेवाडी येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळेत झाले आहे. तर इयत्ता ८ ते १० वीचे शिक्षण हे लेंगरेवाडी-माडगुळे हायस्कूल येथे झाले आहे. तर इयत्ता ११ वी व १२ चे शिक्षण हे श्री भवानी हायस्कूल व आबासाहेब खेबुडकर सायन्स आटपाडी या ठिकाणी झाले आहे.

१२ वी नंतर कु.संचिता लेंगरे हिने चैतन्य अॅकडमी, दहिवडी, साई अॅकडमी, म्हसवड, स्वराज अॅकडमी दहिवडी, ता. माण,जि.सातारा येथे पोलीस भरती सराव सुरु केला. नुकतीच तिची रायगड पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली आहे. तिच्या या निवडीमुळे तिचे अभिनंदन होत आहे.

 

 

Tags :
Sanchita Lengareसंचिता लेंगरे
Next Article