ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

आटपाडी : स्कर्पिओची डमडमला धडक ; एकजण जखमी

10:58 AM Nov 19, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील माणगंगा सहकारी साखर कारखाना चौकामध्ये स्कर्पिओ गाडीने दुधाची वाहतूक करणाऱ्या डमडमला धडक दिली. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी, डमडमच्या चालकाला दुखापत झाली आहे. या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, दुधाची वाहतूक करणारे डमडम हे आटपाडी पूजारवाडीकडून दुध घेवून कौठूळीकडे निघाले होते. माणगंगा सहकारी साखर कारखाना चौकामध्ये डमडम आले असता, आटपाडी कडून सोनारसिद्धकडे जाणाऱ्या रस्त्याकडून स्कर्पिओ गाडी निघाली होती.

दोन्ही गाड्या चौकामध्ये आल्या. यावेळी स्कर्पिओ गाडीने डमडमला धडक दिली. यामध्ये डमडम मधील चालकाला दुखापत झाली. या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या धडकेत लाईटचा खांब कोलमडला, त्यामुळे या ठिकाणची लाईट बंद होती. सदरची घटना काल दिनांक १८ रोजी सायंकाळी ९.०० च्या दरम्यान घडली.

 

Tags :
AtpadiAtpadi NewsAtpadi Polic ThaneScorpio hits Dumdum;
Next Article