ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

आटपाडी : साथ असावी तर अशी ! मुढेवाडीत पती-पत्नीचा एकाच दिवशी मृत्यू

10:31 PM Aug 18, 2024 IST | Mandesh Express

माणदेश एक्सप्रेस न्युज :आटपाडी/प्रतिनिधी : लग्न एक ऋणानुबंध असतं ते लग्नाच्या धाग्यामध्ये अगदी घट्ट जोडलेलं असतं. दोघेही नवरा बायको सात वचन घेतात ते म्हणजे दोघे मिळून प्रत्येक सुख दुःखात एकमेकांना साथ देऊ एवढेच नव्हे तर पुढचे सात जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रत्येक स्त्री ही आपल्या नवऱ्यासाठी वटपौर्णिमेच व्रत करत असते.आयुष्य जगत असताना पावला पावलांवर आपण एकमेकांसाठी बनलेलो असतो अशी कुठेतरी त्यांना जाणीव होत असते.

 

आजही नवरा बायकोची एक आगळीवेगळी हृदयस्पर्शी कहाणी घडली. आटपाडी तालुक्यातील मुढेवाडी येथील रखुमाई रामचंद्र मुढे यांच आज सकाळी निधन झालं. याच दुःख तर सगळ्यांनाच झालं होतं. सकाळी त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार ही करण्यात आले. सगळे नातेवाईक आपापल्या घरी गेले. परंतु घडलं काहीतरी वेगळच!

 

आपण एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही. एका पत्नीला दिलेल वचन पतीने मात्र पाळलं.आणि आज दुपारी चारच्या सुमारास रामू देवबा मुढे यांची ही प्राणज्योत मावळली. या घटनेने मुढेवाडी गावावर शोककळा पसरली. पण एक आगळी वेगळी कहाणी म्हणून याची चर्चा मात्र पूर्ण पंचक्रोशीत झाली.

 

 

Tags :
Mudhewadi News
Next Article