ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

आटपाडी : मानेवाडीत चारचाकी गाडीने उडविल्याने वृद्धाचा मृत्यू

11:52 PM Oct 25, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील मानेवाडी गावच्या हद्दीत एस.टी. पिक शेडजवळ चारचाकी गाडीने उडविल्याने, दुचाकी वरील वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक २४ रोजी सकाळच्या सुमारास घेतली. या अपघाताची नोंद आटपाडी पोलिसात झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी, संतोष राजाराम सातपुते, रा. तळेवाडी, ता. आटपाडी जिल्हा सांगली याने त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड चार चाकी गाडी ( एम एच 13 सी यु 4295) यातील मयत्त धोंडीराम पांडुरंग माळी, हे लुना गाडी (एम एच 10 एव्ही 1385) वरून माळी वस्ती कडून आटपाडी ते भिवघाट रोड क्रॉस करत करून जात होते.

यावेळी आटपाडी बाजूकडून आरोपीने त्याचे ताब्यातील वाहन आटपाडी कडून भिवघाट बाजूकडे घेऊन जात असताना भरधाव वेगाने, अविचाराने, होय गईने हयगयीने, रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून यातील मयताचे लुना गाडीस जोराने धडक दिली. यामध्ये लुना गाडीवरील, धोंडीराम पांडुरंग माळी यांचा या मध्ये मृत्यू झाला.

या अपघाता बाबत नितीन शिवाजी माळी रा. नेलकरंजी यांनी आटपाडी पोलिसात दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर घटनेचा पोलीस अधिका तपास करत आहेत.

 

Tags :
AtpadiAtpadi NewsManewadi Accident
Next Article