ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

आटपाडी : विवाहितेचा छळ प्रकरणी पती, सासू, सासरा, नणंद यांच्यावर गुन्हा दाखल

08:56 AM Sep 22, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : येथील विवाहितेचा छळ प्रकरणी पती, सासू, सासरा, नणंद यांच्यावर विवाहितीने दिलेल्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, विठलापूर येथील सानिका हिचा विवाह रेडे ता. मंगळवेढा येथील सिध्देश्वर नवत्रे याच्याबरोबर झाला आहे. सिद्धेश्वर याने सानिका हिला माहेरहून गाडी खरेदीसाठी पाच लाख रूपये घेवुन येण्यासाठी सातत्याने शारीरिक व मानसिक त्रास देवून घरातून हाकलून दिले होते.

विवाहिता सानिका हिला पती सिध्देश्वर सुखदेव नवत्रे, सासू हौसाबाई नवत्रे, सासरा सुखदेव नवत्रे, नणंद कविता ढगे (रा. नवत्रेवस्ती रेड्डे ता. मंगळवेढा) यांनी संगनमताने माहेरहून नवरा सिध्देश्वर यास गाडी घेण्यासाठी पाच लाख रूपये घेऊन येण्याचा तगादा लावला. त्यासाठी सातत्याने मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आला.

त्यानंतर सानिका हिच्याकडील दागिने काढून घेवुन तिला घरातून हाकलून लावले. सासरच्या मंडळींच्या या कृतीविरोधात सानिकाने आटपाडी पोलिसात फिर्याद दिला. याप्रकरणी रेड्डे येथील सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास आटपाडी पोलीस करत आहेत.

 

 

Tags :
Atpadi NewsAtpadi Polic Thaneआटपाडी बातमी
Next Article