For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

Akshay Shinde encounter : अक्षय शिंदेच्या कथित एन्काउन्टरनंतर आरोपींच्या नातेवाईकांकडून गंभीर आरोप

09:53 AM Sep 24, 2024 IST | Admin@Master
akshay shinde encounter   अक्षय शिंदेच्या कथित एन्काउन्टरनंतर आरोपींच्या नातेवाईकांकडून गंभीर आरोप
Advertisement

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : Badlapur assault case बदलापूरमधील चिमुकलींवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या कथित एन्काउन्टनंतर त्याच्या नातेवाईकांनी आणि पीडितेच्या वकिलांनी पोलिसांसह शाळा व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत.

Advertisement

असीम सरोदे काय म्हणाले...
ठाणे Badlapur assault case - बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेवर गोळीबार म्हणजे न्यायाची हत्या असल्याचं दोन अल्पवयीन पीडित मुलींचे वकील असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. अक्षय शिंदेवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची चौकशी करावी, या मागणीकरिता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं असीम सरोदे यांनी सांगितलं.

Advertisement

सोमवारी रात्री आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणण्यात आला. आज सकाळी न्यायाधीशांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन जेजे रुग्णालयातील तज्ञ तसेच फॉरेन्सिक टीमकडून करण्यात येणार आहे.

Advertisement

अक्षय शिंदे हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मुंब्रा बायपासजवळ संध्याकाळी साडेसहा वाजता ठार झाला. त्यानं पोलिसांची बंदूक खेचून पोलिसांवर गोळीबार केल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात आरोपी शिंदे ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा बदलापूर शाळेतील चिमुकलींवरील बलात्काराचे प्रकरण चर्चेत आले.

Advertisement

वकील असीम सरोदे हे एका माध्यमांशी बोलताना म्हणाले, " दोन अल्पवयीन मुलींची बाजू मांडत असताना ठाणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात अस्वस्थता होती. एवढेच नव्हे तर अक्षय शिंदे काम करत असलेल्या शैक्षणिक संस्थेतदेखील अस्वस्थता होती. आता दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण बाजूला राहिले आहे. अक्षय शिंदे प्रकरणातून येणाऱ्या मुद्द्यांमुळे सरकारवर मोठा नकारात्मक परिणाम झाला असता. अक्षय शिंदेचे हात बांधले असताना त्यानं बंदूक कशी घेतली? तसेच पोलिसांकडील बंदूक अनलॉक कशी केली? याचं मला आश्चर्य वाटत आहे. ही एक राजकीय हत्या आहे. ती पूर्णपणे चुकीची आहे."

Advertisement

आरोपीच्या आईचे गंभीर आरोप- पोलिसांकडून एन्काउन्टर करून अक्षयची हत्या झाल्याचा आरोप त्याची आई आणि काका यांनी आरोप केला. या प्रकरणी न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. अक्षयची हत्या म्हणजे पोलीस आणि बदलापूरच्या शाळा व्यवस्थापनाचा कट असल्याचा आरोपदेखील त्याच्या नातेवाईकांनी केला. अक्षयच्या नातेवाईकाच्या दाव्यानुसार त्यानं पोलिसांकडून कोठडीत मारहाण झाल्याचं सांगितलं होतं. तसेच त्यानं पैशाची मागणी केली होती. अक्षयची आईनं पोलिसांसह शाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले. "अक्षय हा निराश नव्हता. पोलिसांनी आमच्या मुलाला ठार केलं आहे. शाळेच्या व्यवस्थापनाची चौकशी झाली पाहिजे. पोलिसांनी त्याला काहीतरी लिहायला लावले होते. मात्र, ते काय होते, हे आम्हाला माहित नाही. तो रस्ता ओलांडताना आणि फटाके वाजविताना घाबरत होता. मग पोलिसांकडून बंदूक कशी खेचून घेईल? तो असे कधीही करणार नाही, "असा दावा आरोपीच्या आईनं केला.

पोलीस अधिकाऱ्याची खासदारांसह पोलीस आयुक्तांनी घेतली भेट- अक्षय शिंदेच्या एन्काउन्टवर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. "जी घटना घडली, ती योग्य झाली. दोन ते तीन वर्षाच्या मुलीवर हा टाकताना मागे पुढे विचार केला नाही. पोलिसांनी केलेल्या कृत्याचा समर्थन करतो. मी म्हणालो होतो, आमचं सरकार असतं त्याचं एन्काउन्टर केलं असतं शर्मिला ठाकरे यांच्याकडून दोन्ही पोलिसांना 51 हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लवकरच राज ठाकरे त्यांची भेट घेणार आहे.

Tags :