ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

आंदोलनानंतर आटपाडी पोलिसांना आली जाग ; पिडीत मुलीवर हल्ला करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल

11:06 PM Oct 09, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामध्ये लैंगिक अत्याचारग्रस्त पिडीतेवर हल्ला करण्याऱ्या तीन अज्ञात आरोपीवर आटपाडीतील नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर आटपाडी पोलीस जागे झाले असून याप्रकरणी तीन अज्ञात आरोपीवर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आटपाडी येथील आरोपी जिमचालक संग्राम देशमुख व त्याला साथ देणारी महिला सुमित्रा लेंगरे हिने अल्पवयीन मुलाला गाडीत घालून नेले होते. यावेळी आरोपी संग्राम देशमुख याने सदर मुलीवर बलात्कार केला होता. याबाबत आटपाडी पोलिसात आरोपी संग्राम देशमुख व सुमित्रा लेंगरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

दिनांक ०५ रोजी रात्री ८.३० च्या दरम्यान पिडीता घराच्या समोर भांडी घासत असताना, तीन अज्ञातांनी तिच्यावर कटरच्या साह्याने हल्ला केला होता. यामध्ये पीडिती जखमी झाली नसली तरी तिच्या अंगावरील कपडे फाडले होते. पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत तपास चालू केला होता.

गुन्हा घडून चार दिवस झाले त्या अज्ञात आरोपो विरुद्ध गुन्हा दाखल होत नसल्याने, आटपाडीतील विविध संघटनांनी आज धरणे आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनामध्ये माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीचे अरुण वाघमारे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु. टी. जाधव, शैलेश ऐवळे, विलास खरात, अरुण बालटे, चंद्रकांत काळे, रावसाहेब सागर, उत्तम बालटे, महेश देशमुख, श्रीरंग अण्णा कदम, विलास नांगरे पाटील, रुपेशकुमार पाटील, बजरंग फडतरे, सोमनाथ आडसुळ, मधुकर आडसुळ, हणमंत आडसुळ, नितीन आडसुळ, अविनाश चव्हाण, स्नेहजीत पोतदार, रघुनाथ यादव, गणेश जाधव, प्रकाश जाधव, बापूसाहेब मगर, संपतनाना पाटील, पांडुरंग कदम, सनी कदम यांच्यासह अनेक सामान्य नागरिकांनी सहभाग घेत आंदोलन सुरु केले होते.

नागरिकांनी आंदोलन सुरु केल्यावर व आंदोलनाचा रेटा वाढल्यानंतर मात्र आटपाडी पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची जाग आली, अन पोलिसांनी तीन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव यांनी आंदोलनस्थळी निवेदन घेतले. तसेच आटपाडी तहसीलदार यांना देखील निवेदन देण्यात आले.

 

Tags :
Atpadi NewsAtpadi Polic ThaneMLA Rajendranna DeshmukhRajendr KharatRajendranna DeshmukhU T JadhavUttam Jadhav SIrआटपाडी बातमी
Next Article