ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

अवैद्य शस्त्रे बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक ; तलवारी,कोयता, गुप्ती, चाकू,फायटर जप्त

10:04 PM Sep 21, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : कडेगाव : प्रतिनिधी : कडेगाव येथील तरुणाला अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. हर्षवर्धन संभाजी जाधव (वय २१), रा. कडेगाव, ता.कडेगांव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत मथुरा कॉम्प्लेक्स जवळ व्यास हॉस्पिटल समोर आत जाणारे रोड येथे अवैध शस्त्र विक्री होणार असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली होती. पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी तात्काळ पथक तयार करून योग्य सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सदर ठिकाणी वॉच ठेऊन छापा टाकला असता विना परवाना २३५० रुपये किमतीच्या ०३ तलवारी,०१ कोयता, ०१ गुप्ती, ०१ चाकू, ०१ फायटर असा ऐवत जप्त करण्यात आला आहे.

अवैधरित विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण पाटील, पोलीस नाईक पुंडलिक कुंभार, संदीप भवारी, संदीप जाधव पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव या पथकातील सहकार्यांनी ही कारवाई केली आहे

 

Tags :
Kadegav NewsKadegav Polic Thane
Next Article