ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

आटपाडीच्या गाव ओढ्याला आला पैशाचा पुर ; पैसे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी

12:59 PM Oct 19, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज/ आटपाडी/प्रतिनिधी : गाव ओढा म्हंटल की, ओढ्याला साधारणपणे पावसाळ्यात पाणी येत असते. परंतु आटपाडीच्या गाव ओढ्याला पैशाचा पुर आल्याने पैसे गोळा करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांना पैसे सापडले परंतु, काहीजण फक्त बघ्यांची भूमिका घेत होते. या ठिकाणी मोठी गर्दी जमल्याने याठिकाणी पोलिसांना धाव घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी येथून मुख्य ओढा व तलावासाच्या सांडव्या वरून दुसरा ओढा वाहत आहे. हे दोन्ही ओढे आटपाडी बाजार पटांगण येथे एकत्र येतात.
अंबाबाई मंदिरा कडून वाहत येणाऱ्या ओढ्याला सकाळी ५०० रुपयांच्या नोटा वाहत असल्याचे दिसेल. ही बातमी गावामध्ये वाऱ्या सारखी पसरली. या ठिकाणी नागरिकांनी पैसे गोळा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अनेकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे सापडले. या ठिकाणी पैसे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. यामध्ये महिलांचा देखील समावेश होता.

गर्दी वाढत गेल्याने, या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली. पोलिस आल्यावर गर्दी पांगली गेली. परंतु पैसे या ठिकाणी कसे वाहत आले? आटपाडीच्या आठवडी बाजारात आलेल्या एखाद्या व्यक्तीचे पडले होते का? चोरी लपविण्यासाठी एखद्याने पैसे टाकून दिले, याचे गौडगंबल मात्र कायम आहे.

Tags :
AtpadiAtpadi NewsAtpadi Polic Thane
Next Article