ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

72 पदांसाठी सांगली येथे “या” दिवशी निवड मेळावा

08:37 AM Aug 22, 2024 IST | Mandesh Express

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली व त्यांच्या अधिनस्त कार्यालयांमध्ये 72 पदांवर प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याकरिता दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे निवड मेळावा आयोजित केलेला आहे. तरी 18 ते 35 वयोगटातील इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस येताना शैक्षणिक कागदपत्राच्या मुळ प्रती व दोन छायांकित प्रती तसेच Employment कार्ड, आधार कार्ड, बॅक पासबुकच्या दोन छायांकित प्रती घेऊन उपस्थित रहावे. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

 

शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी या कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अहर्तप्रमाणे 12 वी पास 6 हजार, आयटीआय/पदवीका 8 हजार व पदवीधर/पदव्युत्तर 10 हजार शासनाकडून विद्यावेतन दिले जाणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली व त्यांच्या अधिनस्त कार्यालयांमध्ये पुढील पदांसाठी प्रशिक्षणार्थींची आवश्यकता आहे. कार्यालयनिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे -

जिल्हाधिकारी कार्यालय सांगली - 28, उपविभागीय अधिकारी कार्यालय मिरज - 01, तहसिल कार्यालय मिरज - 03, अपर तहसिल कार्यालय सांगली - 3, तहसिल कार्यालय तासगाव - 3, तहसिल कार्यालय कवठेमहांकाळ - 3, उपविभागीय कार्यालय जत - 1, तहसिल कार्यालय जत - 3, अपर तहसिलदार कार्यालय संख - 3, उपविभागीय अधिकारी कार्यालय खानापूर-विटा - 1, तहसिल कार्यालय खानापूर-विटा - 3, तहसिल कार्यालीय आटपाडी - 3, उपविभागीय अधिकारी कार्यालय कडेगाव - 1, तहसिल कार्यालय कडेगाव - 3, तहसिल कार्यालय पलूस - 3, उपविभागीय अधिकारी कार्यालय वाळवा-इस्लामपूर - 1, तहसिल कार्यालय वाळवा-इस्लामपूर - 3, तहसिल कार्यालय शिराळा - 3, अपर तहसिल कार्यालय आष्टा -3 अशा एकूण 72 प्रशिक्षणार्थींची निवड करण्याकरिता निवड मेळावा आयोजित करण्यात आला असून पदाची पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर, MS-CIT, टंकलेखन (मराठी – 30 किंवा इंग्रजी -40 प्र.श.मि.), वयोमर्यादा 18 ते 35 अशी आहे.

 

 

उमेदवाराची पात्रता - उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवाराने MS-CIT व टंकलेखन (मराठी – 30 किंवा इंग्रजी -40 प्र.श.मि.) पूर्ण केलेले असावे. उमदेवाराने Employment कार्ड काढलेले असावे (Employment कार्ड नोंद न झालेले उमेदवार सुध्दा निवड मेळाव्यामध्ये आवश्यक मूळ कागदपत्रासह उपस्थित राहू शकतात), उमदेवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे, उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवाराची आधार नोंदणी असावी, आधार संलग्न असलेले बँक खाते पासबुक / कॅन्सल चेक असावा, शिक्षण चालू असणारे उमेदवार या योजनेस पात्र असणार नाहीत.

 

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर सांगली येथे संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

 

 

Tags :
Chief Minister Youth Work Training
Next Article